मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

पडळकर कुटुंबीयांवर मध्यरात्री हल्ला करणारे टोळके कधी होणार गजाआड ?

mnewsmarathi 19 Aug 2023 1 मिनिट वाचन 8,958 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील ठोंबरेवस्ती या ठिकाणी पाच ते सहा व्यक्तीच्या टोळक्याने एका व्यक्तीस मारहाण करीत धारदार शस्त्राने केला वार ही धक्कादायक घटना दि. १६/८/२०२३ रोजी मुढाळे येथील लोखंडवाडी ठोंबरे वस्ती याठिकाणी रात्रीच्या १ वा. सुमारास घडली .

सदरील घटनेची हकीकत अशी –
संपत पांडुरंग पडळकर रा. ठोंबरेवस्ती याठिकाणी ते १६ तारखेला त्यांनी व त्यांच्या घरातील लोकांनी जेवण केले व त्यानंतर संपत व त्याचा मुलगा रंजन हे घरासमोरील शेड मध्ये झोपले . त्याच दिवशी मध्यरात्री १ वा सुमारास त्यांच्या पाळतू कुत्र्यांचा भुंकन्याचा आवाज आला असता संपत पडळकर याने त्यावेळी बॅटरी चालू करून पाहिले असता त्यांच्या समोरून त्यांच्या भवकितील सिद्धा रामा पडळकर हा त्याच्या हातात लोखंडी हातोडा व त्याचा मुलगा शिवा सिद्धा पडळकर हा त्याच्या हातात लोखंडी कुराड घेऊन आलेले संपत ला दिसले यावेळी त्यांच्या मागोमाग इतर तीन अनोळखी इसम आले त्यापैकी एकाच्या हातात लोखंडी गज व दोघांच्या हातात लाकडी काट्या घेऊन आलेले त्यांना दिसले. यावेळी सिद्धा रामा पडळकर हा संपत पांडुरंग पडळकर याला म्हणाला की तुझे वडील आमच्या मोकळ्या राणात जनावरे का चारतात तुम्हाला लय माज आला आहे काय असे म्हणून त्या कारणावरून त्याने त्याच्या हातातील लोखंडी हातोड्याने संपत याच्या डाव्या पायावर गंभीर दुखापत केली व शिवा पडळकर याने त्याच्या हातातील लोखंडी कुऱ्हाडीने संपत यांच्या डोक्यात मारून डोक्यात देखील गंभीर जखमी केले त्यानंतर सिद्धा पडळकर यांनी त्याच्या हातातील लोखंडी हातोड्याने संपतच्या छातीवर मारहाण केली तसेच त्याच्या सोबत असलेल्या अनोळखी तिन्ही इसमांनी संपत याना पोटावर ,पाटीवर, पायावर, हातावर लोखंडी गजाने व दोन जणांनी लाकडी काठीने मारहाण केली.

त्यावेळी संपत यांच्या आरडाओरडा आवाज ऐकून त्याची पत्नी व भाऊजय बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते . त्यावेळी अनोळखी एका इसमाने बाहेरून दाराची कडी लावली त्यामुळे पत्नी व भाऊजाई या घराच्या खिडकीतून पाहून आरडाओरडा करू लागल्या त्यावेळेस सिद्धा रामा पडळकर याने खिशातून मसाला काढून महिलांच्या डोळ्यात टाकला व आरडा ओरडा करू नका नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली संपत याच्या डोक्याच्या गंभीर जखमी मधून रक्तस्त्राव होत असल्याने ते पाहून संपत याला मारहाण करणारे सर्वजण तेथून पळून गेले व संपत आहे त्या ठिकाणी बेशुद्ध पडले . संपत पडळकर यावर गावडे हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत .

पडळकर कुटुंबामध्ये ह्या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
संपत पडळकर व त्यांच्या कुटंबीयांना प्रशासनाकडून न्याय मिळणार का ? सदरील इसम व अनोळखी व्यक्ती गजाआड कधी होणार ? हा प्रश्न संपत पडळकर व त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे .

लेखक

mnewsmarathi

M News Marathi