• Home
  • माझा जिल्हा
  • निंबुत येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन सोमेश्वर चे मा. अध्यक्ष श्री शहाजीराव काकडे यांच्या हस्ते संपन्न.
Image

निंबुत येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन सोमेश्वर चे मा. अध्यक्ष श्री शहाजीराव काकडे यांच्या हस्ते संपन्न.

 संपादक मधुकर बनसोडे.

 निंबूत येथे जिल्हा परिषद शाळा वॉल कंपाऊंड दहा लाख, कुस्ती आखाडा येथे व्यायाम शाळा दहा लाख, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती सात लाख  रुपयाचा निधी. राज्याचे  उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या विशेष सहकार्यातून. मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती श्री प्रमोद काकडे यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला होता या सर्व विकास कामांचे भूमिपूजन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा. अध्यक्ष श्री शहाजीराव काकडे, युवा नेते श्री गौतम काकडे, ग्रामपंचायत सरपंच निर्मलाताई काळे, निंबुत ग्रामपंचायत उपसरपंच अमर काकडे, नंदकुमार काकडे, कुमाताई काकडे, शिरीष काकडे, पै.राजेंद्र काकडे, लालासाहेब काकडे, विजयराव काकडे, रामभाऊ काकडे, सुमित काकडे, ग्रामविकास अधिकारी काळभोर, यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले यावेळी नींबूत येथील असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी सोमेश्वर चे मा. अध्यक्ष यांनी बोलताना सांगितले विद्येच्या मंदिराचे काम ज्या कॉन्ट्रॅक्टरला मिळते तो खऱ्या अर्थाने भाग्यवान समजला जातो या विद्येच्या मंदिराच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची हाईगाई ग्रामस्थ सहन करणार नाही दर्जेदार व उत्तम प्रकारचे काम आपण करावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. निंबुतच्या विकासाचा गाडा सदैव याच जोमाने चालू राहील त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू अशी भावना सरपंच व उपसरपंच यांनी व्यक्त केली.

 प्राथमिक शाळेमध्ये सर्वसामान्यांची मुलं आज शिकत आहेत निंबूतची प्राथमिक शाळा ही भविष्यात आदर्श शाळा म्हणून पाहिली जाईल यासाठी सर्व प्रयत्न करून शाळा नवा रुपाला आणू असे प्रतिपादन श्री गौतम काकडे यांनी व्यक्त केले.

Releated Posts

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025

बेपत्ता झालेल्या दोन युवकांचा शोध घेण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश.

प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 274/2025 BNS 137(2) मधील मुले 1) शुभम गणेश जाधव वय…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

प्रतिनिधी पुणे, दि.२०: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीकरिता २ आणि २० डिसेंबर…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025

सोमेश्वर’चे अनुदान धोरण फसवे; सभासदांची दिशाभूल थांबवा – शेतकरी कृती समितीचा कारखाना प्रशासनावर हल्लाबोल

​प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अलीकडेच जाहीर केलेले उसाचे अनुदान धोरण हे पूर्णपणे फसवे असून याद्वारे ऊस…

ByBymnewsmarathi Dec 16, 2025