मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 1 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

चिमुकल्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फुगे विक्रेत्यावर गुन्हा दाखल

mnewsmarathi 25 Dec 2023 1 मिनिट वाचन 3,982 वाचन

प्रतिनिधी

गॅसचा फुगा भरताना सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी फुगे विक्रेत्यावर सदर पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला. सत्येंद्र सिंह (४५) असे आरोपी फुगे विक्रेत्याचे नाव असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. शिजान आसीफ शेख (४ वर्षे) असे मृत मुलाचे तर फारीया मुनावर अली आणि अनमता हबीब शेख अशी गंभीर जखमी महिलांची नावे आहेत.

 

आसिफ शेख अली (३८, रा. न्यू मानकापूर) हे पत्नी, मुलगा शिजान आणि दोन्ही मेहुण्या फारीया आणि अनमता यांच्यासोबत रविवारी सायंकाळी कारने स्वेटर आणि कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. परत येत असताना बिशप कॉटन ग्राऊंड जवळ, फ्लेम अँड फायर दुकानावजळ थांबले. तेथे पदपथावर सत्येंद्र सिंह हा गॅसने भरलेले फुगे विक्री करीत होता. शिजानने फुग्यासाठी हट्ट धरला. त्यामुळे फारीया आणि अनमता या दोघीही शिजानला घेऊन फुगे खरेदी करण्यासाठी गेल्या. त्यावेळी सत्येंद्र सिंह हा एका सिलींडरमधून दुसऱ्या सिलींडरमध्ये गॅस भरत होता. यादरम्यान, गॅस सिलींडरचा अचानक स्फोट झाला. गॅसने भरलेले सिलींडर जवळपास २५ फुट ऊंच उडाले आणि शिजानच्या डोक्यात पडले तर स्फोटामुळे फारीया आणि अनामत गंभीर भाजल्या गेल्या. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सदर पोलिसांनी शिजानच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे आणि दोन तरुणींच्या गंभीर जखमी होण्यास जबाबदार असलेल्या फुगे विक्रेता सत्येंद्र सिंहवर गुन्हा दाखल केला. सत्येंद्रचा पोलिसांची दोन पथके शोध घेत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi