मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

बारामती ! विविध योजनांपासून राहावे लागत होते वंचित ; पारधी समाजातल्या काळे परिवाराला अखेर मिळाले रेशनिंग कार्ड . 

mnewsmarathi 05 Jan 2024 1 मिनिट वाचन 9,618 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

  बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावातील रहिवासी मीनाक्षी रमाकांत काळे व रमाकांत अवलचंद काळे या पारधी अनुसूचित जमाती समाजातील दांम्पत्याला त्यांची विभक्त शिधापत्रिका नववर्षाच्या दिवशी सुपूर्द करण्यात आली .

  पारधी समाजातील अशिक्षितपणा व कुटुंबातील काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सदस्यांमुळे अनेक होतकरू तरुणांना मुख्य प्रवाहात येऊन व्यवसाय,नोकरी व शासकीय योजना यापासून वंचित राहावे लागते .

  रमाकांत आवलचंद काळे हे वडगाव निंबाळकर परिसरात चांगल्या पद्धतीने शेती करतात म्हणून विविध शासकीय योजना राबवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असतात परंतु शिधापत्रिकेमध्ये कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असल्याने व काही सदस्य संपर्कात नसल्याकारणाने कागदपत्रांची मोठी अडचण या दांपत्यासमोर निर्माण झाली होती यावेळी त्यांनी ही अडचण कोऱ्हाळे खुर्द गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा रुग्णमित्र सुरज दत्तात्रय खोमणे यांच्याकडे मांडली.

यावेळी त्यांनी वडगाव निंबाळकर चे मंडल अधिकारी तथा पुरवठा सहाय्यक शिवराम देष्टेवाड यांच्याकडे या विभक्त शिधापत्रिकेचे प्रकरण सुपूर्द केले, यावर कर्तव्याचा व माणुसकीचा संगम घालत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या कुटुंबाला कोणतेही हेलपाटे न मारता सदरचे रेशन कार्ड वेळेमध्ये सुपूर्द केले.

   यावेळी या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता व त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदअश्रू तरळले, यावेळी रमाकांत काळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सुरज खोमणे व शिवराम देष्टेवाड यांचे आभार मानले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi