प्रतिनिधी – फिरोज भालदार
शिक्षण प्रसारक मंडळ पुणे २ नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय पुणे २ प्रशालेच्या वर्धापन दिना निमित्त
बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन पुणे , बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्टस असोसिएशन पुणे संलग्न महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन, इंडियन बॉडी बिल्डर्स फेड्रेशन यांच्या संयुक्त मान्यतेने .
नूमवि श्री २०२४ जिल्हास्तरीय ज्युनिअर शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडली यामध्ये बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावच्या प्रितम राजेंद्र जाधव याने दिव्यांग श्री २०२४ शरीर सौष्ठव स्पर्धे मध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे व महाराष्ट्र श्री मध्ये प्रितमची निवड करण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेमध्ये भारत मदने वय ६० वर्षे यांनी मास्टर श्री शरीर सौष्ठव स्पर्धे मध्ये सहावा क्रमांक मिळवून यश मिळविले आहे . प्रितम जाधव व भारत मदने यांच्यावर पंचकृषितून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .
प्रितम हा दोन्ही पायांनी अपंग असून त्याच्या जिद्ध व चिकाटीने त्याने हे शिखर गाठले . यावेळी त्याला त्याचे वडील राजेंद्र जाधव , आई कविता जाधव , व भाऊ तन्मय जाधव व जाधव परिवाराकडून मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
प्रितम ला आपण अपंग असून देखील आपल्या शरीरावर अपंगत्वाचा काही फरक पडला नाही पाहिजे म्हणून त्याने शरीर बनवण्याकडे कल दिला. यामध्ये त्याला AP Fitness club चे अभिजीत पवार सर तसेच रंजन धुमाळ व तन्मय जाधव या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.