प्रतिनिधी – फिरोज भालदार
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर बस स्थानकात शौचालयाची सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे . वडगाव निंबाळकर येथील बसस्थानकामध्ये वडगाव निं. गावातील १२ ते १५ वाड्यावस्त्यावरील नागरिक व शालेय , कॉलेज चे विद्यार्थी बसस्थानकामध्ये बस चा प्रवास करण्यासाठी येतात. या ठिकाणी नागरिकांची व प्रवाशांची नेहमी मोठी वर्दळ असते .
मात्र त्या ठिकाणी शौचालयाची सोय नसल्याने प्रवाश्यांना उघड्यावरच स्वच्छलयास बसावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे . वडगाव निंबाळकर बसस्थानकावरती शौचालय नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व विशेषतः महीलांची मोठी गैरसोय होत आहे .
वडगाव निंबाळकर बसस्थानकामध्ये एस टी महामंडळ प्रशासनाने तातडीने महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय बांधून सुरू करण्याची मागणी प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे .
बस स्थानकामध्ये शौचालय नसल्याने येथे उघड्यावर घाण केली जाते. याकडे कोणाचेही लक्ष नाही. बसस्थानक आवारात फ्लेक्सबाजी होते ,खाजगी वाहने पार्क केली जातात यावर कोणाचेही नियंत्रण नाही असे का ? एस टी महामंडळ प्रशासन या सर्व गोष्टींवर लक्ष घालणार का ? असे प्रवाशी व वडगाव निंबाळकर ग्रामस्थांकडून संबोधले जात आहे .