• Home
  • माझा जिल्हा
  • निरंकारी सदगुरु माताजीं चे ७ फेब्रुवारी ला पुणे येथे आगमन  संत निरंकारी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण हर्षोल्हासामध्ये तयारीचा आरंभ
Image

निरंकारी सदगुरु माताजीं चे ७ फेब्रुवारी ला पुणे येथे आगमन  संत निरंकारी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण हर्षोल्हासामध्ये तयारीचा आरंभ

प्रतिनिधी

           नागपूर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्राच्या ५७व्या वार्षिक निरंकारी संत समागमानंतर निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमीत जी यांच्या मानव कल्याणार्थ प्रचार यात्रे दरम्यान पुणे शहरामध्ये आगमन होत आहे. या बातमीने समस्त संत निरंकारी परिवारामध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण असून हजारोंच्या संख्येने श्रद्धाळू भक्त या संत समागमाच्या तयारीला लागले आहेत.

            पुणे झोन चे प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी या संत समागमाची माहिती देताना सांगितले कि ७ फेब्रुवारी २०२४, बुधवार या दिवशी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत मुकाई चौक, किवळे-रावेत या ठिकाणी हा भव्य संत समागम संपन्न होईल. मानवी जीवन अंतर्मनातील शांतीसुखाने परिपूर्ण करत विश्वामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा कल्याणकारी संदेश जनमानसापर्यंत पोहचविणे हाच या संत समागमाचा उद्देश आहे.

           हा दिव्य संत समागम सर्वार्थाने यशस्वी व्हावा यासाठी निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने अन्य निरंकारी भक्तगण मोठया तन्मयतेने पूर्वतयारीला लागले आहेत. सद्गुरुंच्या दिव्य वाणीचा लाभ घेण्यासाठी समस्त निरंकारी परिवारामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

            सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली संपन्न होणाऱ्या या संत समागमाला पुण्या व्यतिरिक्त मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, संभाजीनगर येथून हजारो च्या संख्येने श्रद्धाळू भक्त उपस्थित राहून सद्गुरूंच्या पावन संदेशाचा लाभ घेतील.

Releated Posts

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026