• Home
  • क्राईम
  • क्रिकेट पिचसाठी आणलेल्या सिमेंट पाईप खाली येऊन बालकाचा मृत्यू
Image

क्रिकेट पिचसाठी आणलेल्या सिमेंट पाईप खाली येऊन बालकाचा मृत्यू

प्रतिनिधी

क्रिकेट खेळण्यासाठी गावाबाहेरच्या शेतात क्रिकेट पिच तयार करण्यासाठी आणलेल्या सिमेंट पाईप खाली दबून दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. आर्यन जयेश चव्हाण (१०) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना पुसद तालुक्यातील वडसद येथे शनिवारी सायंकाळी घडली.

वडसद येथे शेतामध्ये क्रिकेटची पीच तयार करण्यासाठी काही मुलांनी मोठा सिमेंटचा पाईप आणला. क्रिकेट पीच तयार करून पाईप शेतातच पीचजवळ ठेवला होता. काही शाळकरी विद्यार्थी त्या ठिकाणी खेळावयास गेले असता, त्या पाईपखाली येऊन आर्यन चव्हाण याचा जागेवरच मृत्यू झाला. आर्यन हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता चौथीचा विद्यार्थी होता. तो वडसद येथे आजी-आजोबाकडे राहत होता. त्याचे वडील इंदापूर येथील रहिवासी असून आई-वडील ऊस तोडीवर गेले असता त्यांनी मुलाला आपल्या आजी-आजोबाकडे शिक्षणासाठी ठेवले होते

क्रिकेटच्या ग्राउंडवर खेळायला गेलेल्या मुलांपैकी काहींनी पाईप ढकलला. दुर्दैवाने त्या पाईपखाली आर्यन सापडला. पाईप आर्यनच्या डोक्यावरून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस तपास करत आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026