• Home
  • क्राईम
  • पोलीस भरतीला आला आणि पाच वर्षांसाठी तुरुंगात गेला
Image

पोलीस भरतीला आला आणि पाच वर्षांसाठी तुरुंगात गेला

प्रतिनिधी

लोहमार्ग पोलीस दलातील भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवारास न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सागर लालसिंग राठोड (वय ३१, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे शिक्षा सुनावलेल्या तरुणाचे नाव आहे.

पुणे लोहमार्ग पोलीस दलातील भरती प्रक्रियेत राठोड याने बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात राठोडविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले सरकार पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने राठोडला विविध कलमांन्वये दोषी ठरवले. त्याला खडकी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच वर्ष सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड यांनी याप्रकरणाचा तपास केला होता.

Releated Posts

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला तात्काळ अटक

 प्रतिनिधी :   वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत…

ByBymnewsmarathi Aug 5, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

लोणी भापकर येथे कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी भापकर (बोरघाट) येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह…

ByBymnewsmarathi Jul 27, 2026