मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

मोबाईल दिला नाही म्हणून घरात घुसून मैत्रिणीवर कोयत्याने वार

mnewsmarathi 08 Feb 2024 1 मिनिट वाचन 9,935 वाचन

प्रतिनिधी

मोबाईल दिला नाही म्हणून मित्रानेच घरात घूसुन मैत्रिणीवर कोयत्याने वार केल्याची घटना काळेवाडी येथे सोमवारी दुपारी घडली. अविनाश शिवाजी लोखंडे (वय ३०, रा. गुळवे वस्ती, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी तरूणी तिच्या मावस बहिणीच्या घरी असताना आरोपी घरात घुसला. फिर्यादी मोबाईलवर बोलत असताना आरोपीने कोणाशी बोलत आहेस, म्हणून मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादीने मोबाईल देण्यास नकार दिला. याचा राग येवून आरोपीने त्याच्या जवळील कोयत्याने फिर्यादीच्या गळ्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, तरूणीची मावस बहीण सोडविण्यास आली असता तिच्या गालावर कोयत्याने वार करत जखमी केल्याचे पोलिसांनी सांगितले. याचा तपास फौजदार माने करीत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi