• Home
  • क्राईम
  • माजी क्रिकेटपटू केदार भावे यांचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरला
Image

माजी क्रिकेटपटू केदार भावे यांचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरला

प्रतिनिधी

माजी क्रिकेटपटू केदार भावे यांचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सारसबाग परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत केदार श्रीराम भावे (वय ६४, रा. सुभाषनगर, शुक्रवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भावे ६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सारसबाग परिसरातील सणस मैदान परिसरातून निघाले होते. सणस मैदानाजवळ दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी भावे यांच्या हातातील मोबाइल संच हिसकावून नेला. भावे यांनी आरडाओरडा केला. दुचाकीस्वार चोरटे भरधाव वेगाने टिळक रस्त्याकडे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगताप तपास करत आहेत.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026