• Home
  • माझा जिल्हा
  • पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
Image

पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

प्रतिनिधी

पोलिसांकडून शहरातील पब, मद्यालय चालकांविरुद्ध (रेस्टॉरंट आणि बार) कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मध्यरात्री दीडपर्यंत पब आणि मद्यालय सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र, त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब आणि मद्यालयांविरुद्ध कारवाई करावी, असे आदेश पोलिसांना दिले आहेत.

शहरातील विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी रात्री दहानंतर हाॅटेल बंद करण्याच्या सूचना देत आहेत. पोलिसांच्या कारवाईमुळे ग्राहक आणि हाॅटेलचालक धास्तावले आहेत. पोलिसांनी कारवाई सौम्य करावी. हाॅटेल रात्री दीडपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. कारवाईमुळे हाॅटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे. पोलिसांनी कारवाईबाबत विचार करावा, अशी मागणी पब, मद्यालय चालकांच्या संघटनेने बुधवारी केली.

हाॅटेलचालकांची बाजू ऐकल्यानंतर पोलीस अधिकारी आाणि कर्मचाऱ्यांनी रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेलमध्ये प्रवेश करू नये, असे आदेश अमितेश कुमार यांनी दिले. रात्री दीडनंतर हाॅटेल सुरू राहिल्यास व्यवस्थापकाला समज देऊन कारवाई करण्यात येणार आहे. हाॅटेलमधील ग्राहकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार नाही. दीड वाजल्यानंतर अर्धा तास हाॅटेलमधील स्वयंपाकघराची साफसफाई करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. हाॅटेलमधील ध्वनिवर्धक रात्री दहावाजेपर्यंत सुरू ठेवावेत. पोलिसांनी दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026