• Home
  • माझा जिल्हा
  • मायलेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील घटना
Image

मायलेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील घटना

प्रतिनिधी

१३ वर्षीय मुलीसोबत आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास सावली तालुक्यातील खेडी शेतशिवारात उघडकीस आली. दर्शना दीपक पेटकर (३५) आणि समीक्षा दीपक पेटकर (१३) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. त्या मूल येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दर्शना यांनी समीक्षासह खेडी शेतशिवारातील विहिरीत उडी घेतली. त्यांना ग्रामीण रुग्णालय, सावली येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास सावलीचे पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026