प्रतिनिधी – फिरोज भालदार
माळेगाव बु. येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांनी केलेल्या शोध- प्रकल्पाच्या उद्धघाटन समारंभ कार्यक्रम पार पडला याचे उद्घघाटन महेश रोकडे सर मुख्याधिकारी बारामती यांच्या हस्ते करण्यात आले. मिशन क्लीन सीटी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत शिवनगर विद्याप्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यातील टिम इको थ्रेडच्या शोधप्रकल्पाच्या उद्घाटन समारंभ करण्यात आले.
शिवनगर कॉलेजच्या टिम इको थ्रेड च्या विद्यार्थानी कॉटन बॅग वेन्डींग मशीन हा शोध प्रकल्प तयार करण्यात आला होता . या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांनी प्लास्टीक पिशवीला पर्यायी कापडी पिशवी देणाऱ्या यंत्राची निर्मिती केली असुन ते सर्वसामान्य व्यक्तीना घेण्यास परवडेल असे यंत्र उपलब्ध केले होते जे वापरण्यासही अगदी सोपे असून फक्त १० रू मध्ये पिशवी देणारे हे यंत्र तयार करण्यात आले आहे .
हे यंत्र इको क्षेत्र थ्रेड च्या टीम मधील ऋतुजा होळकर, फेनी बारीया, वाडकर हर्षपा, श्रावणी आगम, गौरी नवले आणि मोहमद कर्चे यांनी तयार केले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन आज माळेगाव मधिल नगरपंचायत समोर करण्यात आले . प्रकल्प चांगल्या रित्या पार पडावा म्हणून अमर सिंग तावरे यांनी आपले मोलाचे वेळ काढून या प्रकल्पाला टाईम दिला याचबरोबर शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या डॉ. निता दोशी यांनी या प्रकल्पाला वेळोवेळी योग्य असे मार्गदर्शन विद्यार्थ्याना केले .
या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी कॉलेजचे डॉ. मुकते सर चिफ ऑफिसर ठोंबरे सर, महेश रोकडे सर, मिशन क्लिन सिटी चे हाके सर, सत्यवान गायकवाड सर, नानासाहेब शितोळे सर आदित्य भुतकर, गवई सर, ओंकार जाधव सर, गोरक्षनाथ सर, वयाल सर, अमर सींग वावरे सर, वर्षा इंगळे मॅडम, डॉ निता दोशी मॅडम व पिंगळे मॅडम आदी मान्यवर उपस्थीत होते.