हडपसर गांधी चौकातून महात्मा फुले यांच्या वैचारिक क्रांतीची ज्योत पुण्यातल्या समता भूमीत

इतर

प्रतिनिधी

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 132 स्मृतिदिनानिमित्त हडपसर गांधी चौकात प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर क्रांतीची ज्योत पेटवून ज्योतयात्रा समता भूमीकडे.

याप्रसंगी महात्मा फुले यांचे व्याही सत्यशोधक ग्यानोबा ससाणे यांचे नातू मारुती तुकाराम ससाणे (वय 93) यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मा.नगरसेवक वैशाली सुनील बनकर, उज्वला जंगले,जीवन जाधव,प्रमोद कोद्रे, डॉ कुमार कोद्रे गणेश फुलारे, अमित टिळेकर , विक्रम आल्हाट,भागुजी शिखरे,अनिल धायगुडे,विलास शेलार सचिन आल्हाट, संजय शेवते, विठ्ठल सातव, वृषाली गणेश वाडकर,संगीता बोराटे, बाळासाहेब हिंगणे, स्वप्नील डांगमाळी प्रशांत हिंगणे, महेश बनकर विशाल बोरावके, विशाल तोडकर नितीन आरू, शेखर हिंगणे, स्वप्निल सातव, राजेंद्र ढवळे विद्या होडे, दिलीप गायकवाड स्मिता गायकवाड मनीषा राऊत ओंकार ससाने निलेश ससाने, संतोष ससाणे, अजित ससाणे, अभिजीत ससाणे, दिपाली पांडुरंग माटे, वैष्णवी महेश सातव, गौरी पिंगळे,पल्लवी प्रशांत सुरसे, सोनल कोद्रे, पल्लवी होले, मनीषा राऊत,पूजा लवाटे, मीना कट्टमणी सुवर्णा पगारे, सुनीता नितीन भगत गोरक्ष ससाणे, डॉ. कुमार कोद्रे, गणेश हिंगणे स्वप्निल शिरसागर, विकास होले पांडुरंग गाडे, विवेक आल्हाट, महेश ननावरे, ऍड. पठारे मंगेश कांबळे, वैभव डांगमाळी, बाळासाहेब हिंगणे, योगेश शिंदे,सुधीर होले, प्रमोद सातव, आकाश डांगमाळी, विजय ससाने, माया महेश ससाने, तुकाराम ससाने, परेश सात व आदी सर्व संस्थांचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बनकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र तात्या बनकर व महात्मा जोतीराव फुले समिती तर्फे मुकेश वाडकर यांनी केले , सूत्रसंचालन सतीश भिसे , आभार प्रदर्शन माजी नगरसेवक योगेश बापू ससाने यांनी केले. अभिवादन व ज्योत यात्रे चे आयोजन स्व. अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठान व महात्मा फुले समिती यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते.