• Home
  • क्राईम
  • महाविद्यालयात प्रवेश मिळून देण्याचे प्रलोभन दाखवून एक लाख रुपयांना गंडा
Image

महाविद्यालयात प्रवेश मिळून देण्याचे प्रलोभन दाखवून एक लाख रुपयांना गंडा

प्रतिनिधी

अभियांत्रिकीसाठी महाविद्यालयात प्रवेश मिळून देण्याचे प्रलोभन दाखवून मुलुंड येथे राहणाऱ्या एका इसमाला ओळखीच्याच व्यक्तीने एक लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुलुंडमधील दिनदयाळ नगर येथे वास्तव्यास असलेले अविनाश कवी (४९) यांच्या मुलीला २०२३ मध्ये माटुंगा परिसरातील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीसाठी प्रवेश हवा होता. मात्र कमी गुण मिळाल्यामुळे तिला महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. ही बाब त्यांनी एका मित्राला सांगितली. महेंद्र गमरे या महाविद्यालयात प्रवेश मिळून देईल, असे कवी यांच्या मित्राने त्यांना सांगितले. त्यानुसार कवी यांनी गमरे याची भेट घेतली. प्रवेशासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतील असे गमरेने त्यांना सांगितले. कवी यांनी यावर तत्काळ होकार दर्शवत त्यांना एक लाख रुपये दिले. मात्र प्रवेशाची तारीख निघून गेली तरी कवी यांच्या मुलीला या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. याबाबत त्यांनी गमरे याच्याकडे अनेकदा विचारणा केली. मात्र याबाबत तो टाळाटाळ करू लागल्याने अखेर कवी यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026