• Home
  • क्राईम
  • तरुणीचा खून करून प्रियकराची आत्महत्या; हडपसर भागातील हॉटेलमधील घटना, नातेसंबंधातील प्रेमप्रकरणाला विरोध झाल्याने टोकाचे पाऊल
Image

तरुणीचा खून करून प्रियकराची आत्महत्या; हडपसर भागातील हॉटेलमधील घटना, नातेसंबंधातील प्रेमप्रकरणाला विरोध झाल्याने टोकाचे पाऊल

प्रतिनिधी

नातेसंबंधातील प्रेमप्रकरणाला विरोध करण्यात आल्याने गावाहून पळून आलेल्या तरुणाने प्रेयसीचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हडपसर भागातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. मोनिका कैलास खंडारे (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा चादरीने गळा आवळून खून करण्यात आला. तिचा खून करून प्रियकर आकाश अरुण खंडारे (वय ३०) यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे यांनी फिर्याद दिली आहे.

दोघेजण गावाहून पळून पुण्यात आले होते. हडपसर भागातील मांजरी-मुंढवा रस्त्यावरील स्पॉटलाइट हॉटेलमध्ये दोघांनी खोली भाड्याने घेतली होती. आकाशने १३ मे रोजी मध्यरात्री मोनिकाचा चादरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने खोलीतील पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. दोघेजण मृतावस्थेत सापडल्याची माहिती हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी राख, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उमेश गिते यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली आहे. मोनिका आणि आकाशचे प्रेमसंबंध होते. दोघेही नात्यातील आहेत. प्रेमसंबंधाला विरोध झाल्याने दोघेजण पुण्यात पळून आले होते. पोलीस निरीक्षक गिते तपास करत आहेत.

मोनिका आणि आकाश मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या कसुरा गावचे रहिवासी आहेत. दोघांचे नातेसंबंध असून, त्यांचे प्रेमसंबंध होते. मोनिका आणि आकाशच्या प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध होता. आकाश शेती करीत होता, तर मोनिका नोकरी करीत होती. त्यांच्या प्रेमप्रकरणाला विरोध होत असल्याने त्यांनी यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026