Image

पवना धरणात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

प्रतिनिधी

पवना धरण परिसरात मित्रांसोबत फिरायला आलेल्या पुण्यातील एका महाविद्यालयीन तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. मावळमधील वन्यजीव रक्षक संस्था आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या संस्थेतील स्वयंसेवकांनी बुडालेल्या तरुणाचा शोध घेतला. रात्री उशीरा त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

अद्वैत वर्मा (वय १९, सध्या रा. विमाननगर, पुणे, मूळ रा. दिल्ली) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पुण्यातील एका महाविद्यालयामध्ये बीबीए अभ्यासक्रमाला होता. रविवारी (२३ जून) सुटी असल्याने अद्वैत आणि त्याचे सहा मित्र पवना धरण परिसरात फिरायला आले होते. दुपारी सर्वजण पवना धरणाच्या जलाशयामध्ये पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने अद्वैत बुडाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निधीक्षक किशोर धुमाळ, पवनानगर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी विजय पवार यांनी वन्यजीव रक्षक संस्था आणि शिवदुर्ग मित्र या संस्थेतील स्वयंसेवकांची मदत घेतली. अंधार पडल्यानंतर पथकाने शोधमोहीम सुरु ठेवली. रात्री अद्वैतचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

वन्यजीव रक्षक संस्था आणि शिवदुर्ग मित्रचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, शुभम काकडे, निनाद काकडे, गणेश गायकवाड, रमेश कुंभार, शत्रूधन रासनकर, नागेश कदम हे शोधमोहिमेत सहभागी झाले होते.

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026