• Home
  • क्राईम
  • आंतरधर्मिय विवाह मान्य नसल्याने मोशीत तरुणाचा खून, मृतदेह जाळून हाडे, राख नदीत फेकली
Image

आंतरधर्मिय विवाह मान्य नसल्याने मोशीत तरुणाचा खून, मृतदेह जाळून हाडे, राख नदीत फेकली

प्रतिनिधी

बहिणीने केलेला आंतरधर्मिय विवाह मान्य नसल्याने भावाने दाजीचा डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. डिझेलने मृतदेह जाळून टाकला आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हाडे व राख पोत्यांमध्ये भरून नदीत टाकून दिल्याची घटना मोशीत घडल्याचे उघडकीस आले आहे.

अमिर मोहम्मद शेख (वय २५, रा. आदर्शनगर, मोशी, मूळ अहमदनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पंकज विश्वनाथ पाईकराव (वय २८, रा. मार्तंडनगर, चाकण, मूळ हिंगोली), सुशांत गोपाळ गायकवाड (वय २२, रा. अहमदनगर) आणि सुनील किसन चक्रनारायण (वय ३३, रा. मोई रोड, चिंबळी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. गणेश दिनेश गायकवाड हा पसार आहे.

अमिर आणि सुशांतची बहीण यांचा सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते. त्यानंतर दोघेही मोशी येथे वास्तव्यास होते. मात्र, हा आंतरधर्मिय विवाह अमिरच्या सासरच्या लोकांना मान्य नव्हता. अमिर हा मोशीत एका कंपनीत वाहनचालक म्हणून नोकरी करीत होता. तो १५ जून रोजी राहत्या घरातून कंपनीत कामाला जातो, असे सांगून निघून गेला. तो परत घरी न आल्याने त्याची पत्नी अरिना हिने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती. तपासामध्ये अमिरला पंकजने फोन करून बोलावून घेतल्याचे समोर आले. अमिरचे वडील मोहम्मद यांनीही सुनेच्या माहेरच्या लोकांवर संशय व्यक्त केला होता.

पोलिसांनी पंकजला २१ जून रोजी अटक केली. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. आरोपींनी अमिरला दारू पिण्याच्या बहाण्याने फोन करून बोलावून घेतले. त्याला कुरुळी जवळील पुणे-नाशिक महामार्गावरील एका हॉटेलमध्ये नेऊन दारू पाजली. त्यानंतर तेथून अमिर हा नाणेकरवाडी येथे कंपनीत कामावर गेला. तिन्ही आरोपींनी वेगवेगळ्या दुचाकीवर जावून अमिरला पुन्हा दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून घेले. पंकज व अमिर हे मेदनकरवाडी गावच्या हद्दीतील जंगलात दारू पित बसले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या सुशांत व गणेशने अमिर याला मारहाण करत जंगलात ओढत नेले आणि डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

Releated Posts

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026

​मेढद येथे माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

सहसंपादक- अक्षय थोरात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार, माळेगाव…

ByBymnewsmarathi Jul 1, 2026