प्रतिनिधी
जेजुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक २२/७/२०२४ रोजी सायंकाळी ५/०० वा. नंतर ते दिनांक २३/७/२०२४ रोजी सकाळी ६/०० वा. सुमा मौजे साकुर्डे गावचे हदीत रॉयल शेतकरी हॉटेलचे पार्किंगमधुन होडा कंपनीची शाईन मॉडेलची २०,००० रू किमतीची एक दुचाकी मोटारसायकल चोरीस गेलेबाबत फिर्यादी नामे विकी भिमराव गाडेकर रा नोपडज ता बारामती जि.पुणे यांनी दिनांक २५/७/२०२४ रोजी जेजुरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेवरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.न २७०/२०२४ बी.एन.एस ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोद करणेत आला होता.
दाखल गुन्हयाचे तात्काळ तपास सुरू करून तपासामध्ये गुन्हयात चोरीस गेले वाहन हे निरा व लोणंद जि सातारा भागात विना नंबरने अज्ञात इसम फिरवत असल्याची गोपनीय माहीती मिळालेने, त्या आधारे लोणंद पोलीस स्टेशन व बिबवेवाडी पुणे पोलीस स्टेशनचे मदतीने रेकॉर्डवरील सदर भागातील गुन्हेगाराची माहीती घेतली असता आरोपीत नामे ओम प्रकाश माने रा वीर ता. पुरंदर जि.पुणे २) धीरज संजय गिरे रा येळेवाडी ता. खंडाळा जि. सातारा ३) रोहीत सदानंद शेळके रा टोवरेमळा लोणंद ता. खंडाळा जि.सातारा सध्या रा. अपर पुणे यानां तपासकामी ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने तपास करता त्यांनी नमुद गुन्हयाची कबुली दिली व गुन्हयातील चोरलेली वाहने लोणंद येथे भाडोत्री रूममचे बाहेर लावलेचे सांगितले. त्याआधारे सदर ठिकाणी जावुन चोरीस गेली वरील वर्णनाची मोटारसायकल जप्त करत असतानाच आरोपीकडे आणखीन ३ दुचाकी मोटारसायकल चोरलेल्या मिळुन आल्या. त्याचे नंबरप्लेट काढुन ठेवलेल्या होत्या त्याचेकडे सदर मोटारसायकलीयावत चौकशी करता सदर मोटारसायकलपैकी १ मोटारसायकल लोणंद पोलीस स्टेशन हदीतुन, २री स्ल्पेडर मोटारसायकल सासवड पोलीस स्टेशन हदीतुन तर २ मोटारसायकल जेजुरी पोलीस स्टेशन येथुन चोरून नेल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपीत जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.न २७०/२०२४ बी.एन.एस ३०३(२) या गुन्हयात अटक असुन ते दिनांक ६/८/२०२४ रोजीपर्यन्त पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत.
सदरची कारवाई ही श्री पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण याचे मार्गदर्शनाखाली व श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग बारामती याचे व श्री तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, भोर विभाग सासवड याचे सुचनावरून, जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री दिपक वाकचौरे याचे मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनकडील नेमणुकीचे पो.स.ई तारडे, पो.हवा. तात्यासाहेब विनायक खाडे, पो.हवा. दशरथ बनसोडे, पो.हवा विठठल कदम, पो.कॉ शुभम भोसले यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. हवा. खाडे हे करीत आहे.