• Home
  • क्राईम
  • पुण्यात रस्त्यावर होणाऱ्या वादातून मारहाणीचे प्रकार वाढीस; अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीस्वाराला गजाने मारहाण
Image

पुण्यात रस्त्यावर होणाऱ्या वादातून मारहाणीचे प्रकार वाढीस; अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीस्वाराला गजाने मारहाण

प्रतिनिधी

रस्त्यावर होणाऱ्या किरकोळ वादातून मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकीस्वार तरुणाने अचानक ब्रेक मारल्याने मोटारीतील तिघांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात घडली.

उमेश विठ्ठल काळे (वय ३०, रा. भैरवननगर, धानोरी, विश्रांतवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मोटारीतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काळे यांनी याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार उमेश आजोबांना मामाकडे सोडण्यासाठी निघाले होते. धानोरीतील डाॅ. आंबेडकर शाळेजवळ अचानक एका मोटारचालकाने ब्रेक दाबला. मोटार थांबल्याने पाठीमागून येणारे दुचाकीस्वार उमेश यांनी ब्रेक दाबला. मोटारीच्या पाठीमागे दुचाकीस्वार उमेश थांबले. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या मोटारचालकाने काळे यांना शिवीगाळ केली. अचानक ब्रेक का मारला ? अशी विचारणा करून मोटारीतील तिघांनी त्यांना शिवीगाळ सुरू केली.काळे यांना गजाने मारहाण केली. शिवीगाळ करून मोटारचालकासह तिघेजण पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक पाडेकर तपास करत आहेत.

शहरात रस्त्यावर झालेल्या किरकोळ वादातून वाहनचालकांना मारहाण करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी बाणेर-पाषण रस्त्यावर किरकोळ कारणावरुन एका मोटारचालकाने दुचाकीस्वार तरुणीच्या नाकावर ठोसा मारला. या घटनेत तरुणी जखमी झाली होती. येरवडा भागात मोटारीतून निघालेल्या एका लष्करी अधिकाऱ्याला टोळक्याने शिवीगाळ केल्याची घटना नुकतीच घडली होती.

Releated Posts

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

सहकारनगरातील पद्मावती परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड, तब्बल १५ वाहनांचे नुकसान

प्रतिनिधी पुणे – सहकारनगरमधील पद्मावती परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByBymnewsmarathi Jan 22, 2026

बीडमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह कारमध्ये आढळला!!

प्रतिनिधी बीड येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयात कार्यरत राज्य कर निरीक्षक सचिन नारायण जाधवर (वय ३५)…

ByBymnewsmarathi Jan 18, 2026