मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३१ / ०७ / २०२४ ते ०२ / ०८ / २०२४ दरम्यान तीन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.

माझा जिल्हा

प्रतिनिधी

दि. ३१/०७/२०२४ रोजी व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी ‘अस्वस्थ वर्तमान आणि आपण ‘ या विषयावर प्रा.डाॅ. संदीप सांगळे यांनी विचार मांडले. आजचा वर्तमान हा प्रचंड अस्वस्थ करणारा असून जातीय , धार्मिक अभिनेवेश राजकीय अनैतिकता , शिक्षणाचे बाजारीकरण , कौटुंबिक , सामाजिक पर्यावरण या सर्वच गोष्टी आपणास अस्वस्थ करणार्‍या आहेत. सर्व समाजाने आपला विवेक जागृत ठेवून जगलं-वागलं पाहिजे .वर्तमान अस्वस्थतेतून सुख – समाधान मिळवायचे असेल तर वाचन हा एकमेव मार्ग आहे . वाचनाने माणूस समृद्ध व प्रगल्भ होतो .अशी भूमिका त्यांनी मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक श्री. ऋषिकेश धुमाळ हे होते. त्यांनी कै . बाबांच्या स्मृतींना अभिवादन करून व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डाॅ देविदास वायदंडे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करून कै. बाबांच्या स्मृतींना उजाळा देवून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी केले. डाॅ. नारायण राजूरवार यांनी आभार मानले.

दि. ०१ / ०८ / २०२४ रोजी व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ‘ बदलती शैक्षणिक आव्हाने ‘ या विषयावर शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव चे सचिव डाॅ. धनंजय ठोंबरे यांनी व्याख्यान दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० ही एक नवीन संधी असून , त्याच्या माध्यमातून शिक्षणव्यवस्थेत अमूलाग्र सकारारात्मक बदल घडवू शकतो. त्यातूनच भविष्यातील सुजान समाज घडवता येईल, प्राध्यापक हा समाजनिर्मितीमध्ये महत्त्वाचा घटक असून त्याने त्याची जबाबदारी चोखपणे बजावणे गरजेचे आहे. त्यांनी त्यांचे शैक्षणिक अनुभव सांगून विषयाची मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. अभिजितभैय्या काकडे देशमुख हे होते.त्यांनी कै. बाबांच्या आठवणींना उजाळा देवून व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाचे आभार डॉ. श्रीकांत घाडगे यांनी मानले

दि. ०२ / ०८ / २०२४ रोजी व्याख्यानमालेचा तिसर्‍या दिवशी ‘ भाषा, संस्कृती व समकाल ‘ या विषयावर प्राचार्य डाॅ. शिरीष लांडगे यांनी विचार मांडले.भाषा आणि संस्कृती ही जैविक गरज आहे.भारत हा बहुभाषिक, बहुसांस्कृतीक देश असून विविधेतेत एकता हे भारताचे सामर्थ्य आहे. जगातील सर्वात मोठा सांस्कृतिक इतिहास भारताला आणि महाराष्ट्राला असून त्याचा अभ्यास ही काळाची गरज आहे. आज आभासी जग वास्तव वाटू लागले असून खर्‍या अर्थाने वास्तवाचे भान येणे काळाची गरज झाली आहे. अशी भूमिका त्यांनी मांडली . कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य देविदास वायदंडे हे होते. यांनी कै. बाबांच्या स्मृतींना उजाळा दिला. भाषा, साहित्य, संस्कृती ही समकालाची अपत्य असतात. त्या अभ्यासातून तत्कालीन परिस्थितीचे आकलन होत असते. ही भूमिका त्यांनी मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डाॅ. प्रवीण ताटे देशमुख यांनी केले.त्यामध्ये कै.बाबांची दानशूर वृत्ती, त्यांची सामान्य जनतेविषयीची तळमळ, त्यांचं सहकार, राजकारण, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला…कार्यक्रमाचे आभार डाॅ. संजू जाधव यांनी मानले. याप्रसंगी प्रा. सुजिता भोईटे, उपप्राचार्य डाॅ जगन्नाथ साळवे , डाॅ. जया कदम, डाॅ. जवाहर चौधरी, सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी, सेवक कार्यक्रमास उपस्थित होते.