शुक्रवार दि.16/08/2024 रोजी सायंकाळी 5:00 वा.नाझरे धरण 100 % भरल्यामुळे नाझरे धरण प्रकल्पाला भेट. श्री संभाजी होळकर.

माझा जिल्हा

प्रतिनिधी

नाझरे धरण प्रकल्पातंर्गत बारामती तालुक्यातील मोरगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील 16 गावांच्या पिण्याच्या पाण्याची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नाझरे धरणावर अवलंबून आहे व शेतीच्या सिंचनासाठी काही गावातील शेतीसाठी पाणी आवर्तन सोडले जाते.

            तसेच यावेळी नाझरे धरण प्रकल्प उपअभियंता श्री.दत्तात्रय कसबे व शाखा अभियंता श्री.ए.ए घोडके यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बारामती तालुका तहसिलदार मा.श्री.गणेश शिंदे साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मा.संभाजी होळकर , बारामती दुध संघाचे चेअरमन मा.पोपटराव गावडे, मा.सरपंच पोपटराव तावरे, श्री.अशोकराव कोकणे, श्री.अनिलराव लडकत, दुध संघाचे व्हा.चेअरमन श्री. संतोष शिंदे, श्री.विश्वास पवार, श्री.शिवराज चांदगुडे, श्री.तेजस जाधव, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.