• Home
  • क्राईम
  • गुंगीचे इंजेक्शन देऊन शाळकरी मुलीवर अत्याचार; शाळेतील तक्रार पेटीमुळे अत्याचाराला वाचा
Image

गुंगीचे इंजेक्शन देऊन शाळकरी मुलीवर अत्याचार; शाळेतील तक्रार पेटीमुळे अत्याचाराला वाचा

प्रतिनिधी

नात्यातील एका मुलीला गुंगीचे ओैषध असलेले इंजेक्शन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून आरोपी मुलीच्या नात्यातील आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी २१ वर्षीय तरुण मुलीच्या नात्यातील आहे.

मुलीच्या दंडावर गुंगीचे ओैषध असलेले इंजेक्शन आरोपीने दिले. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर तिची छायाचित्रे काढली. समाज माध्यमात छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. संबंधित प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास धमकी दिली. मी जेव्हा भेटायला बोलावेल. तेव्हा यायचे, अशी धमकी आरोपीने मुलीला दिल्याचे तिच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

बारामतीतील दोन मुलींना पुण्यात बोलावून त्यांच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली होती. अखेर वाचा फुटली… पीडीत मुलगी एका शाळेत शिक्षण घेत आहे. आरोपी मुलीच्या नात्यातील आहे. याप्रकाराची माहिती वडिलांना दिल्यास ते चिडतील. वाद होतील. त्यामुळे मुलीने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली नव्हती. अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविण्यात आल्या आहेत. मुलीने तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती अर्जात लिहिली होती. मुलीने तक्रार पेटीत अर्ज टाकला. शालेय प्रशासनाने तिचा अर्ज पाहिला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीच्या नात्यातील २१ वर्षीय तरुणाला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026