मुख्य मजकुरावर जा
Thursday, 17 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 24 September 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने मित्रावर तीक्ष्ण शस्त्राने वार

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 24, 2024 1 मिनिट वाचन 8,513 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

पेट्रोल भरण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर मित्रावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. अरबाज अरिफ सय्यद (वय २८, रा. कुबेरा कॉलनी, एनआयबीएम रस्ता कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत योगेश रामदास लोंढे (वय २८, रा. सोमेश्वर सोसायटी, उंड्री) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोंढव्यातील कडनगर परिसरात योगेश एका पंक्चर दुकानात रविवारी सकाळी थांबला होता. त्याच्या दुचाकीचे चाक पंक्चर झाले होते. अरबाजने त्याच्याकडे पेट्रोल भरण्यासाठी पैसे मागितले. योगेशने पैसे देण्यास नकार दिल्याने तो चिडला. शिवीगाळ करून त्याने योगेशला मारहाण केली, तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पसार झालेल्या अरबाजला पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील तपास करत आहेत.

गुळणा करताना हटकल्याने अल्पवयीनाने ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात दगड मारल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. ज्येष्ठाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी १६ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. बाशीर हैदर चौधरी (वय ६८, रा. गणेश कॉलनी, महादेवनगर, सिंहगड रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा समीर बाशीर चौधरी (वय ४०) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाशीर २१ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास गॅरेजसमोर थांबले होते. त्यावेळी मुलगा गुळण्या करत होता. बाशीर यांनी त्याला हटकले. मुलाने बाशीर यांच्या डोक्यात दगड मारला. पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर तपास करीत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख