• Home
  • क्राईम
  • धक्कादायक! अंगणवाडीमध्ये बुरशी, जाळे लागलेला आहार पुरवठा
Image

धक्कादायक! अंगणवाडीमध्ये बुरशी, जाळे लागलेला आहार पुरवठा

प्रतिनिधी

एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्पाअंतर्गत अभ्यंकर नगर, हनुमान नगर यासह इतर भागात येत असलेल्या मुक्ताबाई अंगणवाडी केंद्रात महिला बचत गटाच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा रोजी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. हा बालकांच्या जीवाशी खेळ असल्याचा माहिती ,अंगणवाडी सेविका बबिता सारंगपुरे यांनी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम यांना दिली.

मुक्ताबाई अंगणवाडीत पाठविलेल्या बालकांना उत्तम आहार मिळत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी याबाबत नगरपरिषदेच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी यमुना नागदेवे आणि बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार पवनीकर यांच्याकडे अनेकदा तक्रार केल्यानंतरही संबंधित अधिकारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे सांगण्यात आले. अंगणवाडी सेविकेने शिवसेनेकडे केलेल्या तक्रारींची दखल घेऊन गुरुवारी सकाळी मुक्ताबाई अंगणवाडीमध्ये जाऊन चौकशी केली. यावेळी मुक्ताबाई अंगणवाडी केंद्र क्रमांक ९३, ९४, ९५ (४११) यामध्ये बालकांना निकृष्ट दर्जाचे आहार देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. तसेच रोजी महिला बचत गटाच्या माध्यमातून बालकांना ताजा पोषण आहार व्यवस्थितरित्या करून देण्यात येत नसून त्या आहारात अळ्या व सोंडे दिसून येतात. याबाबत अंगणवाडी सेविकाकडून अनेकदा तक्रार करूनही संबंधित अधिकारी याकडे डोळेझाक करीत असून येथे साधी पाहिनी सुध्दा केली जात नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका व पालकवर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

भंडारा जिल्ह्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार पवनीकर, सहाय्यक रचना घरवार यांच्यासह संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी शिवसेनेने निवेदनाद्वारे माहिती दिली. सदर रोजी महिला बचत गटाच्या माध्यमातून शिळे, बुरशी, जाळे असलेल्या अन्न बालकांना देण्यात येत आहे. यामुळेच मुक्ताबाई अंगणवाडीमध्ये बालकांच्या प्रकृती बिघडत असल्याची माहिती दिली आहे. शिवसेनेने गुरुवारी सकाळी मुक्ताबाई अंगणवाडीला भेट देऊन पाहणी केली. लहान मुलांच्या जीवाशी खेळ करून निकृष्ठ आहार पुरवठा करणाऱ्या संबंधित बचत गटावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम, अंगणवाडी सेविका बबिता सारंगपुरे यासह काही पालक वर्ग उपस्थित होते.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026