• Home
  • क्राईम
  • पाच कोटींच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह शिष्यांचे अपहरण, कर्नाटकातून तिघे अटकेत
Image

पाच कोटींच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह शिष्यांचे अपहरण, कर्नाटकातून तिघे अटकेत

प्रतिनिधी

धार्मिक कार्यक्रमासाठी कर्नाटकात नेण्याच्या बहाण्याने पुजाऱ्यासह शिष्यांचे पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बिबवेवाडी आणि कर्नाटक पोलिसांच्या पथकाने कर्नाटकातून तिघांना अटक केली. आरोपींना न्यायालयाने पाच ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

रामू अप्पाराय वळुन (वय २९, रा. त्रिकुंडी, ता. जत, सांगली), दत्ता शिवाजी करे (वय २०), हर्षद सुरेश पाटील (वय २२, रा. आसंगी ता. जत, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत जरंग तुळशीराम लांडे (५१, रा. पीएमटी कॉलनी, समर्थनगर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. बजरंग लांडे हे पुजारी आहेत. २९ जुलै रोजी त्यांचा मुलगा स्वप्निलला आरोपी घरी येऊन भेटले. त्यांनी विजापुरात हर्षद पाटीलच्या घरी पूजा करायची आहे, तसे मूर्ती प्रतिष्ठापना करायची आहे, अशी बतावणी केली. त्यानंतर लांडे यांना कर्नाटकात पूजेसाठी आमंत्रित केले. लांडे आणि त्यांचे सात शिष्य कर्नाटकात गेले. आरोपींनी त्यांना एका खोलीत डांबून ठेवले. आरोपींनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून पाच कोटींची खंडणी मागितली. लांडे कुटुंबीयांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला.

तांत्रिक तपासात आरोपी रायचूर परिसरात असल्याची माहिती मिळाली. कर्नाटक पोलिसांना यााबाबतची माहिती देण्यात आली. कर्नाटकातून पोलिसांच्या सहकार्याने तिघांना रायचूर परिसरात अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त आर. राजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगल मोंढवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, ज्योतिष काळे, सुमीत ताकपेरे यांनी ही कारवाई केली.

Releated Posts

लोणी भापकर येथे कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी भापकर (बोरघाट) येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह…

ByBymnewsmarathi Jul 27, 2026

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026