• Home
  • क्राईम
  • पुणे रेल्वे स्थानकातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण, गुजरातमधून महिलेसह दोघांना अटक; बालक सुखरुप
Image

पुणे रेल्वे स्थानकातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण, गुजरातमधून महिलेसह दोघांना अटक; बालक सुखरुप

प्रतिनिधी

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात आले. लोहमार्ग पोलिसांनी तपास करून अहमदाबादमधून एका महिलेसह दोघांना अटक केली. अपहृत बालकाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

मोहम्मद खान कुरेशी (वय २७), नजमा अक्रम खान कुरेशी (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत बालकाची आई पूजा संतोष दास (वय २८, रा. झारखंड) यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पुणे रेल्वे स्थानकातून १७ सप्टेंबर रोजी पूजा दास नातेवाईकांसोबत झारखंडला निघाल्या होत्या. त्यांच्याबरोबर सात महिन्यांचा मुलगा होता. रेल्वे स्थानकाच्या आवारात आरोपी मोहम्मद आणि नजमा यांनी पूजाशी ओळख केली. त्यांना बोलण्यात गुंतविले. पूजा यांच्या ताब्यातून बालकाला नजमाने घेतले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून मोहम्मद आणि नजमा पसार झाले.

गणेश विसर्जनाच्या रेल्वे स्थानकाच्या आवारातून बालकाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास सुरु केले. बालकाचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपासात पसार झालेले आरोपी अहमदाबादमधील उनावा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथक अहमदाबादला रवाना झाले. पोलिसांनी नजमा आणि मोहम्मद यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून बालकाची सुखरुप सुटका करण्यात आली.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त अधीक्षक रोहीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, इरफान शेख, पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, उपनिरीक्षक स्वप्नील वाघमारे, सचिन नाझरे, पोलिस कर्मचारी सुनील कदम, अनिल टेके, आनंद कांबळे, निलेश बीडकर, अनिल दांगट, विकास केंद्रे, जयश्री ढाकरे यांनी ही कारवाई केली.

Releated Posts

लोणी भापकर येथे कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी भापकर (बोरघाट) येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह…

ByBymnewsmarathi Jul 27, 2026

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026