• Home
  • माझा जिल्हा
  • बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी चिमुकल्याचा मृत्यू, आईच्या डोळ्यांसमोर मुलावर बिबट्याची झडप
Image

बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी चिमुकल्याचा मृत्यू, आईच्या डोळ्यांसमोर मुलावर बिबट्याची झडप

प्रतिनिधी

बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वंस राजकुमार सिंग या सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना मांडवगण फराटा येथे घडली. खेळण्या-बागडण्याच्या वयात झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली.

मांडवगण फराटा गावातील गोकुळनगर-दगडवाडी रस्ता येथील संदीप अशोक घाडगे यांच्या मालकीच्या वाघेश्वर गूळ उद्योग येथे गुऱ्हाळवर राजकुमार नथू सिंग हे कुटुंबासमवेत कामाला आहेत. राजकुमार सिंग आणि त्यांची पत्नी रेखा यांच्यात शुक्रवारी घरगुती कारणावरून किरकोळ वाद सुरू होता. रात्रीच्या वेळी आई पुढे चालत असताना मागून त्यांचा मुलगा वंस हा जात होता. मागे येणाऱ्या मुलाचा जोराने रडण्याचा आवाज आल्यानंतर आईने वळून पाहिले असता बिबट्याने मुलावर झडप घातली होती. आईच्या डोळ्यासमोरच चिमुकल्यावर हल्ला करत बिबट्याने त्याला ऊसाच्या शेतात नेले. त्यानंतर आईने मोठ्याने आरडाओरडा केला. त्यानंतर तेथे आलेल्या गुऱ्हाळ कामगार, ऊसतोड कामगार आणि जमलेल्या नागरिकांनी मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. बिबट्याने हल्ला केल्याची माहिती पोलीस आणि वनविभागाला देण्यात आली. रात्री उशिरा चिमुकल्याला गंभीर जखमी अवस्थेत शोधण्यात यश आले. उपचारांसाठी त्याला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. हल्ला केलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून त्याचा शोध घेऊन तत्काळ पिंजरे आणि सापळा कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी १२ पिंजरे आणि नऊ सापळा कॅमेरा लावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

Releated Posts

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026