मुख्य मजकुरावर जा
Thursday, 17 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 13 January 2025 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा १७ जानेवारी रोजी

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
January 13, 2025 1 मिनिट वाचन 8,524 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

 

 प्रतिनिधी.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता नौरोसजी वाडिया महाविद्यालय, बंडगार्डन रोड, पुणे येथे ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध उद्योजकांनी २ हजारपेक्षा जास्त रिक्तपदे कळविली आहेत. त्यांच्याकडून ही सर्व रिक्तपदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

इच्छुकांनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांना अर्ज करावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रेझ्यूमे) प्रती सोबत आणाव्यात, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, ४८१, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे ४११०११ येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा ०२०- २६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख