• Home
  • क्राईम
  • पुणे स्टेशन परिसरातील लॉजमध्ये व्यावसायिकाची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन महिला वकिलावर गुन्हा
Image

पुणे स्टेशन परिसरातील लॉजमध्ये व्यावसायिकाची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन महिला वकिलावर गुन्हा

प्रतिनिधी

अनैतिक सबंधातून एका व्यावसायिकाने पुणे स्टेशन परिसरातील एका लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन एका महिला वकिलाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत व्यावसायिकाच्या पत्नीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिला वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहे.

पुणे स्टेशन परिसरातील एका लाॅजमध्ये व्यावसायिकाने गळफास घेऊन ९ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. त्यावेळी महिला वकील तेथे उपस्थित होती. या महिला वकीलाचे पती न्यायाधीश असून त्यांना यांच्यातील अनैतिक संबंधांची कल्पना होती, असे व्यावसायिकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला वकील आणि व्यावसायिकाची व्यावसायिक कारणातून ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. महिला वकिलाने पत्नी आणि मुलाला सोडून दे. माझ्यावर रहा, असे सांगून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती.

व्यावसायिकाचा मुलगा आणि आरोपीं महिलेची मुलगी यांचा विवाह लावून दे, अशी धमकी दिली. व्यावसायिकाने महिलेकडून व्यावसायिक कारणासाठी ३० लाख रुपये उसने घेतले होते. पैसे न दिल्याने व्यावसायिकाच्या नावावर असलेली सूस परिसरातील सदनिका नावावर करुन देण्याची मागणी केली. ९ जानेवारी रोजी महिला वकिलाने व्यावसायिकाला पुणे स्टेशन परिसरातील एका लाॅजमध्ये बोलावून घेतले होते. पत्नी आणि मुलाला सोडून दे. अन्यथा माझ्यासमोर आत्महत्या कर, अशी धमकी दिली. त्यानंतर व्यावसायिकाने लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी महिला वकील तेथे उपस्थित होते, असे व्यावसायिकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026