बारामती ! वडगाव निंबाळकर मुस्लिम दफन भूमीमधून रस्त्याच्या विषयावरती महसूल अधिकाऱ्यांकडून पाहणी .

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार.

वडगाव निंबाळकर ता. बारामती येथील मुस्लिम दफन भूमी मधून रस्त्याची मागणीवरून महसूल विभागाचे अधिकारी यांच्याकडून पाहणी करण्यात आली .

वडगाव निंबाळकर येथे मुस्लिम दफन भूमी संरक्षण भिंतीचे काम चालू असता त्याठिकाणाहून काही ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार यांना रस्त्याच्या मागणीकरिता अर्ज करण्यात आला होता. यावरून महसूल अधिकारी बारामती तहसीलदार गणेश शिंदे , गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्याकडून दिनांक ५/३/२०२५ रोजी वडगाव निंबाळकर येथे पाहणी करण्यात आली व दोन्हीकडील बाजू जाणून घेण्यात आल्या .

महसूल अधिकारी यांच्याकडून सर्वत्र पाहणी करण्यात आली यामध्ये पावसाळ्यात ओढ्याला पूर येत असल्याने त्याठिकाणी नुकसान होते असे काही ग्रामस्थांकडून संबोधण्यात आले यावेळी ओढा खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी देखील अधिकाऱ्याकडून पाहणी करण्यात आली व ग्रामपंचायत प्रशासनाला ओढा खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी सांगण्यात आले .

यावेळी वडगाव निंबाळकर रस्ता मागणी करणाऱ्या काही ग्रामस्थांकडून त्याठिकाणाहून पाई रस्ता होता व तो आम्हाला मिळावा असे मागणी करण्यात आली आहे . व
मुस्लिम समाजाकडून त्यांचे म्हणणे याठिकाणी पहिली संरक्षण भिंत होती व ती जीर्ण झाल्याने नवीन बांधण्यासाठी ४० लाख रुपये निधी आला व त्याचे काम चालू केले असता काही ग्रामस्थांकडून त्याठिकाणी रस्त्याची मागणी करण्यात आली मात्र याठिकाणी रस्ता नव्हता व कागदोपत्री नकाशात देखील हा रस्ता नाहीये असे मुस्लिम समाजाकडून सांगण्यात आले .

यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता .