वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन आयोजित गुन्हयातील जप्त दागीने व रोख रक्कम फिर्यादीस प्रदान. परिसरातून कौतुकाचा वर्षाव.

Uncategorized

प्रतिनिधी.

वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.रजि. नंबर ३७/२०२५ भा.न्या.स. कलम ३३१(३),३०५ (अ), मधील जप्त दागीने व रोख रक्कम असा एकुण २,४९,०००/- रूपये किमतीचा मुद्येमाल फिर्यादी श्री सचिन विठ्ठल करे वय ३७ राह- पळशी ता. बारामती जि.पुणे. असा चोरी घरफोडी मधील जप्त केलेला मुद्येगाल मा. श्री पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, सो पुणे ग्रामीण., मा.श्री गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक, सो बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी सो बारामती उपविभाग, बारामती यांचे शुभहस्ते फिर्यादी यांना परत करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री सचिन काळे स.पो.नि वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन यांनी केला आहे.

फिर्यादी श्री सचिन विठ्‌ठल करे वय ३७ यह पळशी ता. बारामती जि.पुणे. यांनी चोरीस गेलेला मुद्येमाल पोलीसांनी पुढाकार घेवुन कमी सायासामध्ये कोर्ट कचेरीच्या फेऱ्या न मारता ताब्यात मिळाल्याने आनंद व्यक्त करून मा. श्री पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, सो पुणे ग्रामीण. मा.श्री गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक, सो बारामती विभाग, व मा. श्री सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी सो बारामती उपविभाग, बारामती यांचे आभार व्यक्त केले आहेत.