• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती! पंचक्रोशी प्रकाशन आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलन व पारितोषिक गुणगौरव सोहळा संपन्न .
Image

बारामती! पंचक्रोशी प्रकाशन आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलन व पारितोषिक गुणगौरव सोहळा संपन्न .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सालाबादप्रमाणे पंचक्रोशी प्रकाशन आयोजित प्रकाशन व राज्यस्तरीय काव्य संमेलन विविध स्पर्धा पारीतोषिक व गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम बारामती तालुक्यातील होळ (10 फाटा) अभिषेक मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किरण आळंदीकर, कवी हनुमंत चांदगुडे, सोमनाथ सुतार, ग्रामीण कथाकार रवींद्र कोकरे, साहित्यीका राधिका पंडीत, साहित्यिका सोनल गोडबोले, सागर वायाळ यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली .

यावेळी बाळकृष्ण बाचल, श्रीराम घडे, गटशिक्षणाधिकारी संजय जाधव , प्रा. नितिन काळे, युवराज खलाटे, परशुराम लडकत, लक्ष्मण शिंदे, त्रिंबक भोसले, हर्षल होळकर, रामदास नरूटे, सुनंदा कर्चे, वनिता जाधव, कांतीका वसेकर, गणपत तरंगे, करण होळकर, योगेश हरणे, चंद्रकांत चाबुकस्वार, व आलेल्या सर्व कवी /कवियेत्री यांनी कविता, गजल सादर केल्या .

या कार्यक्रमामध्ये सर्व प्रकारच्या कविता अनुभवन्यात आल्या यामध्ये राजकीय,शेती,आई – वडील , चालू घडामोडी याचप्रकारे विविध विशयांवरती कवींनी कविता सादर केल्या. आलेल्या सर्व कवींना सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विशेषतः महिला दिनानिमित्तच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यानिमित्त कार्यक्रमामध्ये महिला भगिनिंचा सहभाग जास्त प्रमानात असताना दिसला.

यावेळी सर्व कवी एकत्र येऊन सर्वांनी आपल्या कविता ,गजल गाऊन सादरीकरण केल्या. यावेळी जणू काय कवींचा मेळावाच भरला आहे असे वाटत होते . कार्यक्रमावेळी बाळासो कर्चे संपादीत आनंत रूपात तू .. कवितासंग्रह या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब कर्चे यांनी केले व कार्यक्रम चांगल्या रित्या पार पाडला सर्व कवी / कवयित्री यांच्याकडून त्यांना भरभरून पुढील वाटचालीस शुभेच्छा व आम्हा सर्व कवी यांना आमच्या कथा , कविता मांडता आल्या सर्व कवींनी कर्चे यांचे आभार व्यक्त केले.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025