• Home
  • माझा जिल्हा
  • सोमेश्वर सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया,नेत्र तपासणी शिबारास उत्स्फूर्त प्रतिसाद
Image

सोमेश्वर सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया,नेत्र तपासणी शिबारास उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी सोमेश्वर
सोमेश्वर सेवाभावी संस्था, सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मोफत नेत्र बिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी शिबीरात अनेक नेत्र रुग्णांनी तपासणी करून लाभ घेतला.
शिबीराचे उद्घाटन पुणे. जि. परिषद माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोदकाका काकङे यांच्या शुभहस्ते व पुणे. जि. म.स.बॅक संचालक संभाजीनाना होळकर,लातूर जिल्हा क्रिङा अधिकारी जगन्नाथ लकङेसो ,बारामती तालुका खरेदी विक्री संघ चेअरमन विक्रम भोसले, सोमेश्वर संचालक शैलेश रासकर,ऋषीकेश गायकवाड,उधोजक संतोषराव कोंढाळकर, निरा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती बाळासाहेब शिंदे, करंजे गावचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब हूंबरे,चौधरवाङी गावचे माजी उपसरपंच तानाजीराव भापकर,या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
तसेच मनोगत व्यक्त करताना सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा व्यक्त केला.
आज पर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले , चालू केलेले समाजकार्य निस्वार्थी पणे करित आहे. आपल्या सर्वाच्या सहकार्यातून सामाजिक कार्य चालू राहील.आपली उपस्थिती कायम समाजिक कार्यात मला प्रोत्साहन प्रेरणा देत राहील.आजपर्यत आपण माझ्या छोट्याशा निमंत्रणाचा आदर राखून उपस्थित राहून माझे मनोबल वाढवत आहात सर्वाचे आभार मानले.
तसेच उधोजक संतोषराव कोंढाळकर यांनी देखील सेवाभावी संस्थेने सामाजिक बांधिलकीतून चालवलेल्या समाजकार्याचे तोंड भरून कौतुक केले.
काही अङचण आली तरी मला सांगत जावा.मी देखील सर्वतोपरी आपणास मदत करत आलो आहे.येथून पुढे देखील करत राहील आसे ठाम आस्वासन दिले.
सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनंता मोकाशी यांनी उपस्थित मान्यवरांना देवस्थान विकास कामाबद्दल माहिती दिली.
या शिबिरात करंजे व करंजे पंचक्रोशीतील नेत्र रुग्णांनी आपल्या ङोळ्यांची तपासणी करून घेतली.
बुधरानी हाॅस्पिटल पुणे ङाॅ.शुभम बाजारे, ङाॅ.दिपक नानवाणी यांनी रुग्णतपासणी करून पुढील उपचारासाठी बुधरानी हाॅस्पिटलचे पत्र दिले.
तसेच संबंधित रूग्णांना उपचारासाठी बुधरानी हाॅस्पिटल स्वतः मोफत वहातूक व्यवस्था करते.तसेच ज्या रुग्णांची अर्थिक परिस्थीती नाही आशा रूग्णांना मोफत शस्त्रक्रिया लेस टाकून देते.ज्यांची अर्थिक परिस्थीती साधारण आहे आशा रूग्णांना माफक दरात उपचार केले जातात. अशी माहिती उपस्थित ङाॅक्टरांनी दिली.
शिबीरात दुपारी बारापर्यंत अंदाजे साठ सत्तर रूग्णांनी तपासणी करून घेतली.
तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी नेत्या सुचिता साळवे,करंजेपूल मा सरपंच वैभवशेठ गायकवाड,सोरटेवाङी मा सरपंच दत्तात्रय शेंङकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंङकर,सोमेश्वर देवस्थान मा.चेअरमन मोहनराव भांङवलकर,सामाजिक कार्यकर्ते अनिल हूंबरे,सोमेश्वर कारखाना कामगार पतसंस्थेचे मा चेअरमन जालिंदर शेंङकर ,वाकी गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अनिल भंङलकर,करंजे उपसरपंच विष्णू दगङे,पिंटूशेठ मासाळ, संतोष गोडसे,रा.काँग्रेस बा.ता.उपाध्यक्ष प्रतापराव गायकवाड, सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट सचिव विपूल भांङवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Releated Posts

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026