प्रतिनिधी.
दिनांक 07/08/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मरीमाता कलेक्शन जवळ मूर्टी येथे www.funrep.pro या लिंक वरून मोबाईल मध्ये ID व पासवर्ड पाठवून ऑनलाइन जुगार चालवणारे इसम नामे 1. संतोष रामदास रासकर राहणार करंजे रासकर मळा तालुका बारामती जिल्हा पुणे. 2. महेंद्र रामचंद्र मोरे राहणार मूर्टी तालुका बारामती जिल्हा पुणे यांना त्यांच्याकडे असलेल्या मोबाईल सहित ताब्यात घेऊन चौकशी केली असता, funrep या ॲप वरून ऑनलाईन जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी सदरचा ऑनलाइन जुगार हा 3. रोहित पवार पूर्ण नाव माहित नाही राहणार वानेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे व 4. विक्रम जाधव पूर्ण नाव माहित नाही राहणार मोढवे तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्या मदतीने चालवत असल्याचे समोर आले. सदर कारवाईमध्ये एकूण 17850/ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार अमोल भोसले हे करीत आहेत.
सदरची कारवाई माननीय संदीपसिंह गिल्ल , पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माननीय गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, माननीय सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली नागनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, डी एस वारुळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, अमोल भोसले व एस पी देशमाने ,पोलीस हवालदार यांनी मिळून केली.
