मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
खेळ

खंडाळा तालुका मैदानी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल पिंपरे बुद्रुक येथील विद्यार्थ्यांना मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

mnewsmarathi 26 Dec 2022 1 मिनिट वाचन 9,444 वाचन

प्रतिनिधी- सोपान कुचेकर

पिंपरे बु।।दि.26/12/2022तालुका खंडाळा मैदानी स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पिंपरे बुद्रुक शाळेने सहभाग नोंदविला. दि. 14 डिसेंबर 2022 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व आदर्श विद्यालय शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खंडाळा तालुकास्तरीय शालेय मैदानी 2022 स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थाचे न्यू इंग्लिश स्कूल पिंपरे बुद्रुक धायगुडे मळा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

लहानपणापासूनच मुलांना विविध खेळांची तसेच परंपरागत खेळ खेळले जाऊन ओळख करून दिली जाते खेळामुळे शारीरिक व्यायाम व्यायामासोबत मानसिक व्यायाम ही होतो हे पटवून देत मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी चौधरी एस. आय. सर यांनी मुलांना मार्गदर्शन केलेखंडाळा तालुका मैदानी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल पिंपरे बुद्रुक शाळेने सहभाग नोंदविला. 17 वर्षे वयोगटांमध्ये 4×100 मी. रॅली धावण्याच्या शर्यतीत या शाळेतील अधिराज सावता जाधव ,अथर्व पिंकू शेठ धायगुडे ,सार्थक अमोल शिंदे, संग्राम शिवदास कुंडलकर मुलांनी तृतीय क्रमांक पटकविला तसेच 14 वर्षे वयोगटांमध्ये गोळा फेक या क्रीडा प्रकाशत मध्ये आदित्य बाळू खताळ या विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांक पटकाविला .यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक श्री. चव्हाण एम .एम. यांनी केले या यशा पाठीमागील मार्गदर्शक श्री. चौधरी एस. आय. या सरांचे लाभले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi