• Home
  • माझा जिल्हा
  • राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित — पुणे जिल्ह्यातून एकमेव महिला मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांची निवड
Image

राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित — पुणे जिल्ह्यातून एकमेव महिला मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांची निवड

प्रतिनिधी

         महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने देण्यात येणारा “राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार” हा मानाचा सन्मान पुणे जिल्ह्यातील निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्री बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली विनोद ननावरे यांना प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ, मुंबई यांच्या ६४ व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनात दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, विद्यानगर, कराड येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

        मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे या त्यांच्या उपक्रमशील नेतृत्व, नाविन्यपूर्ण कार्यपद्धती, आणि शिक्षणातील नवनवीन कल्पनाशक्तीसाठी ओळखल्या जातात. “कोणतीही गोष्ट अशक्य नाही” हा ठाम विश्वास बाळगून त्या सतत शिकत राहण्याची आणि इतरांनाही पुढे घेऊन जाण्याची जिद्द जोपासतात. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबवलेले उपक्रम, शिक्षकांना दिलेले प्रोत्साहन, आणि समाजाभिमुख शैक्षणिक दृष्टिकोन यामुळेच त्यांची राज्यस्तरावर “गुणवंत मुख्याध्यापक” म्हणून निवड सार्थ व योग्य ठरली आहे.

         या सन्मानामुळे सौ. दिपाली ननावरे मॅडम यांच्या कार्याचा आणि त्यांच्या नेतृत्वाखालील विद्यालयाचा नावलौकिक राज्यस्तरावर झळकला आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या परिश्रमांची आणि शिक्षणसेवेतल्या निष्ठेची अधिकृत दखल असून, संपूर्ण विद्यालय परिवारासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला आहे.

        पुरस्कार स्वीकृतीनंतर आपल्या मनोगतात ननावरे मॅडम म्हणाल्या —”हा पुरस्कार माझ्या वैयक्तिक यशाचा नाही, तर संपूर्ण विद्यालय परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे.विशेषतः निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान या आमच्या संस्थेचे मी मनःपूर्वक आभार मानते. संस्थेच्या प्रेरक नेतृत्वाने आम्हाला सदैव मार्गदर्शन दिले, नवकल्पनांना चालना दिली आणि विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भक्कम पाठींबा दिला.त्यांच्या सहकार्यामुळेच शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत झाली, आणि विद्यार्थ्यांच्या जीवनमूल्यांचा पाया अधिक मजबूत झाला. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या आशीर्वादाचे व आमच्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे तेजस्वी प्रतीक आहे.”

       दीपावलीच्या या प्रकाशमय पर्वावर प्राप्त झालेला हा सन्मान विद्यालय व संस्थेच्या नावलौकिकाला नवचैतन्य देणारा ठरला आहे.सौ. दिपाली विनोद ननावरे मॅडम यांचे हे यश शिक्षणक्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

या पुरस्कारासाठी संस्थेचे अध्यक्ष सन्मानीय श्री सतिश भैया काकडे, सन्मानीय उपाध्यक्षा सौ सुप्रियाताई पाटील , सन्मानीय मानद सचिव श्री मदनभैया काकडे,सन्मानीय ज्येष्ठ संचालक श्री .बनसोडे भीमराव सर,सन्मानीय सर्व संचालक मंडळ, सन्मानीय शिक्षक व शिक्षकेतर बंधू ,सन्मानीय पालक वर्ग ,सन्मानीय ग्रामस्थ, सन्मानीय सर्व माजी विद्यार्थी, मित्र परिवार आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Releated Posts

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025

बेपत्ता झालेल्या दोन युवकांचा शोध घेण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश.

प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 274/2025 BNS 137(2) मधील मुले 1) शुभम गणेश जाधव वय…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

प्रतिनिधी पुणे, दि.२०: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीकरिता २ आणि २० डिसेंबर…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025

सोमेश्वर’चे अनुदान धोरण फसवे; सभासदांची दिशाभूल थांबवा – शेतकरी कृती समितीचा कारखाना प्रशासनावर हल्लाबोल

​प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अलीकडेच जाहीर केलेले उसाचे अनुदान धोरण हे पूर्णपणे फसवे असून याद्वारे ऊस…

ByBymnewsmarathi Dec 16, 2025