• Home
  • माझा जिल्हा
  • पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 निमित्त निरा–मोरगाव रस्ता 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत बंद
Image

पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 निमित्त निरा–मोरगाव रस्ता 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत बंद

प्रतिनिधी.

डांबरीकरणाच्या अंतिम टप्प्यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

येणाऱ्या पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा 2026 आणि निरा–मोरगाव रस्त्यावर सुरू असलेल्या अंतिम डांबरीकरणाच्या कामांच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या अहवालानुसार या रस्त्याचे बिटुमिन काँक्रीटचे अंतिम थराचे काम वेगाने आणि एकाच टप्प्यात पूर्ण करण्यासाठी मार्ग पूर्णपणे मोकळा असणे आवश्यक आहे. स्पर्धेदरम्यान मोठ्या प्रमाणात सायकलपटू या मार्गाचा वापर करणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक बंद करणे आवश्यक असल्याचे पोलीस विभागानेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे 20 नोव्हेंबर 2025 ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत, दररोज सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत, निरा–मोरगाव रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

या काळात वाहनचालकांना अनेक पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रस्त्याचे वेगवेगळे भाग कामासाठी बंद असताना वाहतूक मोरगाव–लोणीपाटी–लोणी भापकर–पेशवे वस्ती–करंजे पूल–सोमेश्वरनगर, मुर्ती–वाकी–करंजे–सोमेश्वरनगर तसेच चौधरवाडी फाटा–करंजे–सोमेश्वरनगर या मार्गांनी वळविण्यात येणार आहे. जेजुरी, वडगाव निंबाळकर आणि सुपा पोलीस हद्दीतून जाणाऱ्या वाहनांसाठी निरा (लोणंद नाका)–वाल्हे–जेजुरी (मोरगाव चौक)–मोरगाव हा मुख्य पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि सुरू असलेल्या कामास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. डांबरीकरणाचे काम वेळेत पूर्ण करून स्पर्धेदरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, तसेच रस्त्याची गुणवत्ता उत्तम राहावी, यासाठी ही तात्पुरती वाहतूक व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Releated Posts

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026