• Home
  • माझा जिल्हा
  • कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार
Image

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा लागला आहे.

 या अपघातात विकास कुंडलिक कांबळे, सुरेश रामेश्वर सोनवर ( रा. मालेगाव ता. गेवराई जि. बीड) हे दोन तरुण अपघातात मृत्युमुखी पडले आहेत.

  गेवराई तालुक्यातील मालेगाव येथून ते तरुण बारामती तालुक्यात ऊस तोड करायला आले होते. बारामती आगाराची एस टी बस ( एम. एच ४२ बी टी ४४२१ ) नीरा बाजूकडून बारामती कडे चालली होती तर मयत तरुण आपली डिस्कव्हर दुचाकी ( एम.एच. १७ ए यू ०१६८ ) वरून बारामती बाजूकडून नीरा बाजूकडे चालली होती. कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान खामगळ पाटी नजीक हॉटेल मयुरी समोर हा अपघात घडला. दुचाकी वरील मयत तरुण एस टी बसच्या चालक बाजूच्या चाकाला धडकले. एस टी चालकाने त्यांना चुकवण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्याचे काम चालल्याने त्यांना एस टी बस रस्त्याखाली नेता आली नाही.

     सदर अपघाताची माहिती कळतच वडगाव निंबाळकर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी जखमींना बारामती येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. मात्र अपघातात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला होता. गंभीर जखमी असलेल्या दुसऱ्या तरुणाला तात्काळ पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला..

 ठेकेदाराची दिरंगाई लोकांच्या जीवावर..

निरा बारामती या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. मात्र या कामाच्या ठेकेदाराकडून काम करत असताना मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होत आहे. रस्त्याच्या साईट पट्ट्या खोदून ठेवल्याने अपघात होत आहेत. वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाय योजना नाहीत. अपघाताच्या दोन दिवस आधी त्या ठिकाणी बोलेरो कार ही उलटली होती. सदर काम अतिशय संथगतीने सुरू असून असेच काम सुरू राहिले तर आणखीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Releated Posts

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025

बेपत्ता झालेल्या दोन युवकांचा शोध घेण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश.

प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 274/2025 BNS 137(2) मधील मुले 1) शुभम गणेश जाधव वय…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

प्रतिनिधी पुणे, दि.२०: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीकरिता २ आणि २० डिसेंबर…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025

सोमेश्वर’चे अनुदान धोरण फसवे; सभासदांची दिशाभूल थांबवा – शेतकरी कृती समितीचा कारखाना प्रशासनावर हल्लाबोल

​प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अलीकडेच जाहीर केलेले उसाचे अनुदान धोरण हे पूर्णपणे फसवे असून याद्वारे ऊस…

ByBymnewsmarathi Dec 16, 2025