• Home
  • क्राईम
  • तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल
Image

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील रुई बयाजीनगर येथे घडली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३, रा. रुई बयाजीनगर, बारामती) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे मामा सत्यवान आप्पा इंगळे (रा. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सृष्टी विकास मते, श्रृती विकास मते आणि विकास मते (सर्व रा. खडकवासला, पुणे) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मृत विक्रम आणि आरोपी सृष्टी मते यांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, सृष्टीने सुरुवातीला लग्नाचे आमिष दाखवले, मात्र नंतर घरच्यांचे कारण सांगून लग्नास नकार दिला. २७ डिसेंबर २०२५ पासून सृष्टी आणि तिची बहीण श्रृती यांनी विक्रमला सातत्याने फोन करून मानसिक त्रास देण्यास व ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती.

पुणे येथे बोलावून घेऊन विक्रमच्या मोबाईलमधील फोटो आणि चॅटिंग जबरदस्तीने डिलीट करण्यात आले व त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. तसेच सृष्टीचे वडील विकास मते यांनीही विक्रमच्या नातेवाईकांना फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

​१५ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ७ ते ७:४५ च्या सुमारास विक्रमने राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये त्याने म्हटले आहे की, “आई मला माफ कर… मला ब्लॅकमेल केले असून खूप मानसिक त्रास दिला जात आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे”. या चिठ्ठीत त्याने आरोपींनी केलेल्या त्रासाचा सविस्तर उल्लेख केला आहे.

​या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल आनंद कदम करत आहेत.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026