मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 28 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 21 March 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

मु. सा काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील बहुविषयक चर्चासत्राचे आयोजन

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
March 21, 2026 1 मिनिट वाचन 8,540 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात दिनांक २३ व २४ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील बहुविषयक सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेमिनार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येत आहे.

*“वाणिज्य आणि व्यवस्थापन, सामाजिक शास्त्रे, विज्ञान व भाषा क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि भावनिक बुद्धिमत्ता (EI) यांचा समन्वय: संधी, आव्हाने आणि भविष्यातील दिशा”* हा या सेमिनारचा मुख्य विषय असून, सध्याच्या डिजिटल युगातील शैक्षणिक, संशोधनात्मक आणि सामाजिक बदलांच्या पार्श्वभूमीवर हा विषय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

या सेमिनारमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन, सामाजिक शास्त्रे (अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, भूगोल), , भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी), विविध विज्ञान शाखा (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणक विज्ञान, पर्यावरणशास्त्र), ग्रंथालय व माहिती विज्ञान, शारीरिक शिक्षण व क्रीडा, संरक्षण व सामरिक अभ्यास तसेच डिजिटल ह्युमॅनिटीज आणि आंतरशाखीय संशोधन या विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

हा सेमिनार माजी विद्यार्थी आर. एन. शिंदे सभागृह, मु. सा. काकडे महाविद्यालय येथे आयोजित करण्यात येणार असून देशभरातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि अभ्यासक यांना आपले संशोधन सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

निवडक संशोधन निबंधांना समकक्ष पुनरावलोकन (Peer Reviewed) असलेल्या ISSN जर्नलमध्ये प्रकाशनाची संधी दिली जाणार आहे. इंग्रजी, हिंदी व मराठी या भाषांमध्ये संशोधन निबंध प्रकाशित केले जाणार आहेत.

महाविद्यालयाच्या वतीने सर्व संबंधित प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व अभ्यासकांना या राष्ट्रीय सेमिनारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून अधिकाधिक जणांनी या शैक्षणिक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजक आणि माविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी केले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख