अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) बारामतीच्या वतीने बारामतीतील विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी कॉलेज कॅम्पस लगत असलेल्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी
बारामती मध्ये दिवसेंदिवस वाढत असलेली विद्यार्थ्यांची वर्दळ, वाहनांची सुरक्षितता तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मागणी करण्यात आली.
यासंदर्भात नगराध्यक्ष सचिनशेठ सातव तसेच नगर परिषदेचे मुख्य अधिकारी (CO) भुसे साहेब यांना निवेदन देण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगराध्यक्ष सचिनशेठ सातव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे सूचना दिली.
या प्रसंगी अभाविपचे जिल्हा संयोजक अभिषेक भापकर, जिल्हा सह संयोजक ओंकार तावरे, शहर मंत्री स्वप्नील गावडे, शहर संपर्क प्रमुख पारस हवलदार तसेच प्रतिक ननावरे, ओम परकाळे, आदित्य ननावरे, हर्षवर्धन शेळके आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
अभाविपतर्फे करण्यात आलेल्या या मागणीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सकारात्मक पाऊल उचलले जात असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
