• Home
  • क्राईम
  • कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी
Image

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व फिर्यादीचे नातेवाईक यांना आरोपी व आरोपीचे मित्र यांनी बेकायदेशीरित्या जमाव जमवून काचेची बॉटल, लाकडी दांडके, लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी एकूण 13 जणांवरती दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील एक इसम ऋषिकेश सुरेश शिंदे हा गंभीर जखमी असून सान्वी हॉस्पिटल करंजे पुल या ठिकाणी उपचार घेत आहे. यातील 08 आरोपी वरती अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

गुन्हा रजिस्टर नंबर 30/2026 BNS कलम 118(2),118(1),115(2),189(2),191(2),191(3),190

1.या गुन्ह्यातील फिर्यादी नामे ऋषिकेश सुरेश शिंदे राहणार करंजे पूल तालुका बारामती जिल्हा पुणे (सध्या अंतररुग्ण असून उपचार घेत आहे)

2.आरोपीची नावे: १. सखाराम अहिरे २. गणेश अहिरे, ३. महेश अहिरे वरील तिन्ही राहणार नसरापूर तालुका वेल्हा जिल्हा पुणे.४. स्नेहल सुरेश जगताप राहणार निंबुत तालुका बारामती जिल्हा पुणे, ५. सागर बाळू साळुंखे, ६. संकेत सतीश सोनटक्के दोन्ही राहणार मानाजी नगर साक्षी संकुल फेज पुणे ७. साहिल भरत सावंत व ८. संदीप लक्ष्मण लगस राहणार सिंहगड रोड विठ्ठलवाडी हिंगणे, पुणे

गुन्हा रजिस्टर नंबर 29/2026BNS कलम 118(1),115,189(2),191(2),90,351,352

1. फिर्यादीचे नाव स्नेहल सुरेश जगताप राहणार निंबुत तालुका बारामती जिल्हा पुणे

2. आरोपीची नावे १. संकेत सुरेश शिंदे, २. ऋषिकेश सुरेश शिंदे, ३ निकिता गणेश अहिरे, ४. रत्ना सुरेश शिंदे व,५. अश्विनी संकेत शिंदे सर्व राहणार करंजेपुर तालुका बारामती जिल्हा पुणे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे करीत आहेत.

कोणीही बेकायदेशीर जमाव जमून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची प्रयत्न केल्यास त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026