प्रतिनिधी.
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात१९ फेब्रुवारी२०२६ रोजी सकाळी८.००वा. शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन निंबूत ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा.श्री.भीमराव बनसोडे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी मा.श्री.भीमराव बनसोडे सरांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याची आणि कर्तुत्वाची ओळख करून दिली.आलेल्या मान्यवरांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांनी केले व आपल्या प्रास्ताविकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती सांगितली.
विद्यालयातील विद्यार्थिनी कु.अक्षरा लकडे व कु.संचिता काकडे या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवरायांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.विद्यालयातील शकुंतलामाई मुलींच्या लेझीम पथकाने आपले लेझीम नृत्य सादर केले,तसेच यावेळी श्री. छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी झुलवा पाळणा या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माचे पाळणा गीत नृत्यातून सादर केले. समस्त ग्रामस्थ निंबूत यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शाबासकी दिली.
निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.सतीशभैय्या काकडे दे.उपाध्यक्षा मा.सौ.सुप्रियाताई अश्विनकुमार पाटील, मानद सचिव मा. श्री.मदनराव काकडे दे. यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.














