मुख्य मजकुरावर जा
Sunday, 20 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 15 June 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
June 15, 2026 1 मिनिट वाचन 8,528 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे खोके जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि माळेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे केली.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी अवघड कदरू तांबोळी याचा शोध घेण्यात आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे व दोन काडतुसांचे खोके जप्त करण्यात आले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्रास्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेली शस्त्रे आरोपीकडे कशी आली, त्यांचा वापर कोणत्या उद्देशासाठी होणार होता तसेच त्यामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अवैध शस्त्रास्त्रांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख