मुख्य मजकुरावर जा
Sunday, 20 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 15 June 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
June 15, 2026 1 मिनिट वाचन 8,531 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

 

शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय आजोबांच्या डोक्यात व पाठीवर लोखंडी गजाने वार करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दुर्योधन दशरथ राऊत (रा. बाभुळसर बुद्रुक, ता. शिरूर) यांनी मांडवगण फराटा पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. दशरथ यशवंत राऊत (वय-८४) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव असून,सोमनाथ बाळासो राऊत (वय-२६)असे आरोपी नातवाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ राऊत हा शिघ्रकोपी स्वभावाचा असून घरातील व शेतीची कामे सांगितल्यावर तो वारंवार कुटुंबीयांशी वाद घालत असे. दोन दिवसांपूर्वी त्याने वडील बाळासो राऊत यांनाही मारहाण केली होती. सोमवारी सकाळी दुर्योधन राऊत हे मंदिरात दर्शनासाठी जात असताना त्यांच्या वडिलांना आरोपी सोमनाथ राऊत हा लोखंडी गजाने मारहाण करत असल्याचे त्यांना दिसले.

त्यांनी हस्तक्षेप करून आरोपीला थांबविले असता, ‘आजोबा नेहमी मला घरातील व शेतातील कामे सांगतात. आजही त्यांनी काम सांगितल्यामुळे रागाच्या भरात मी त्यांना मारले,’ असे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या दशरथ राऊत यांना तातडीने मांडवगण येथील वरदविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग यांनी त्वरित घटनास्थळी भेट देत पाहणी केली. आरोपी सोमनाथ राऊत याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख