प्रतिनिधी –
जनता शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, खलाटे वस्ती, लाटे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक योगाभ्यासात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.बारवकर टी.बी यांनी योगदिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन तसेच विविध प्राणायामाचे प्रकार करून विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, एकाग्रता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असे मार्गदर्शन श्री.हिरवे सरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
प्रशालेच्या प्रांगणात शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या योग सत्रात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले.
शेवटी सर्वांनी “निरोगी जीवनासाठी नियमित योग करूया” असा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता केली.













