मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 29 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 29 June 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
June 29, 2026 1 मिनिट वाचन 8,534 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७ व २८ जून रोजी दत्तकला महाविद्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या अभ्यासवर्गामध्ये विद्यार्थी कार्यकर्त्यांचे वैचारिक, संघटनात्मक व व्यावहारिक प्रशिक्षण विविध सत्रांद्वारे देण्यात आले.

अभ्यासवर्गाचे उद्घाटन दत्तकला महाविद्यालयाचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. रामदास झोल, ओंकार तावरे तसेच अभ्यासवर्ग प्रमुख तन्मयी कोंढाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संघटनात्मक कार्य, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी याबाबत मार्गदर्शन केले.

अभ्यासवर्गात अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री श्रावणी बाचल यांनी अभाविपची भूमिका, कार्यपद्धती, संघटनात्मक रचना व विद्यार्थी चळवळीचे महत्त्व याविषयी सविस्तर मांडणी केली. तसेच कार्यकर्ता व्यवहार, प्रभावी भाषणकला, महाविद्यालयीन कार्य, संघटन विस्तार आणि नेतृत्व विकास या विषयांवर विविध मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले.

व्यावहारिक प्रशिक्षणामध्ये प्रवास व संपर्क, बैठका घेण्याची पद्धत, लघुनिधी संकलन, नियोजन आणि संघटन कौशल्य अशा विषयांवर प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना संघटनात्मक कार्याची व्यावहारिक माहिती मिळाली.

याशिवाय अभ्यासवर्गात विशेष मुलाखत सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात अभाविपचे पूर्व कार्यकर्ते राजेश बाचल यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव, विद्यार्थी चळवळीतील योगदान आणि सामाजिक कार्यातील वाटचाल याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांमुळे उपस्थित कार्यकर्त्यांना समाजकार्यासाठी नवचैतन्य आणि प्रेरणा मिळाली.

तीन दिवस चाललेल्या या अभ्यासवर्गामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संघटन कौशल्य, वैचारिक स्पष्टता आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाल्याची भावना सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख