मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Wednesday, 23 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 23 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

वाघोलीत एटीएम मशीन पळवण्याचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड; टेम्पो आणि मोबाईल जप्त

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 23, 2026 1 मिनिट वाचन 3,501 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

लोहगाव-वाघोली रोडवरील इंडिया एटीएम (India Cash ATM) मशीन चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हे शाखा युनिट ७ आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने एका आरोपीला टेम्पोसह बेड्या ठोकल्या आहेत.

​१८ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २:०० ते ४:३० च्या सुमारास वाघोली येथील पीएमपीएमएल चार्जिंग स्टेशनजवळ असलेल्या इंडिया एटीएम सेंटरमध्ये काही इसमांनी टेम्पोमधून येत एटीएम मशीन उचकटून खाली पाडले. मात्र, मशीन अत्यंत जड असल्याने ते उचलून नेणे शक्य झाले नाही. त्यामुळे आरोपींनी तेथून पळ काढला होता. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली व खबऱ्यांमार्फत माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे एस.टी. कॉलनी, वाघोली येथून गणेश अशोक पवार (वय ३२ वर्ष, रा. वाघोली, मूळ रा. मार्केटयार्ड, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.

​चौकशीदरम्यान आरोपीने त्याचा साथीदार सुनील देवकर व इतर दोन दुचाकीवरून आलेल्या साथीदारांच्या मदतीने हा दरोड्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला ₹५,००,००० किमतीचा टाटा एसी (CNG) टेम्पो आणि ₹५,००० चा ओप्पो मोबाईल फोन जप्त केला आहे.

​ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वीनी सातपुते, पोलीस उप आयुक्त श्री गौहर हसन, सहा. पोलीस आयुक्त श्री राजेंद्र मुळीक व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ७ आणि दरोडा विरोधी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख